PMFBY पीक नुकसान: ७२ तासांत अधिकृतरीत्या कळवा
स्थानिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवणे आवश्यक आहे. येथे मसुदा पत्र तयार करा आणि अधिकृत मार्गांनी नुकसान नोंदवा. किसानपे दावा दाखल करत नाही.
महत्त्वाचे: नुकसान ७२ तासांत थेट विमा कंपनीला कळवा
- Crop Insurance ॲप (भारत सरकार) मधून नुकसान नोंदवा
- कृषी रक्षक हेल्पलाइन 14447 वर कॉल करा
- विमा कंपनी टोल-फ्री: 1800-116-515
- किंवा आपल्या बँक शाखा / तालुका कृषी अधिकाऱ्यांना लेखी कळवा
किसानपे विमा दावा नोंदवत नाही व Claim ID देत नाही. खालील पत्र केवळ मसुदा आहे.
१. नुकसान व शेतकरी तपशीलदावा पत्र फी: ₹२९
२. मा. तालुका कृषी अधिकारी साहेब, ता. [तालुका], जि. पुणे
मी उपरोक्त शेतकरी मौजे [गाव], तालुका [तालुका], जिल्हा पुणे येथील शेतजमीन गट नंबर [गट नं.] मधील चालू खरीप/रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अधिकृत विमा भरला असून माझा पावती क्रमांक [विमा पावती क्र.] हा आहे.
सदर शेतात चालू हंगामात सोयाबीन / कांदा पिकाची लागवड केली होती. तथापि, नुकत्याच घडलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे (अतिवृष्टी व शेतात पाणी साचल्याने पीक सडले) शेतातील उभे पीक पूर्णतः पाण्यात सडून 80% ते 100% नुकसान झाले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या कलम १४ नुसार, स्थानिक आपत्ती (Localised Calamities) उद्भवल्यास ७२ तासांच्या आत विमा कंपनी व कृषी विभागाला लेखी कळवणे बंधनकारक असल्याने, मी ही पूर्वसूचना सादर करीत आहे.
तरी महसूल, कृषी विभाग व विमा प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष शेतात येऊन संयुक्त पंचनामा करावा आणि नियमांनुसार पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करावी, ही नम्र विनंती.
अर्जदार शेतकरी स्वाक्षरी